स्वातंत्र्य समरावरील साहित्याचे  रोटरी वाचन कट्ट्यात वाचन

बातमी शेअर करा...
जळगाव – येथील रोटरी क्लब जळगाव व व. वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये रोटरी वाचन कट्टा आयोजित करण्यात आला होता.
            यावेळचा विषय स्वातंत्र्य संग्राम होता. विविध मान्यवर सदस्यांनी स्वतंत्र भारताच्या स्वप्नासाठी लढलेल्या क्रांतिकारक, साहित्यिक आणि विचारवंतांच्या कार्याची ओळख करून देणारे निवडक साहित्य वाचून सादर केले.
          यात स्वाती ढाके यांनी १८५७ चे स्वातंत्र्य समर – लेखक : स्वातंत्र्यवीर सावरकर, अनघा व्यवहारे हिने गांधीजींचे आत्मचरित्र, डाॅ. शुभदा कुलकर्णी यांनी वसंत बापट यांची दोन स्फूर्तीगीते (सदैव सैनिका पुढेच जायचे इ.), सुबोध सराफ यांनी मृणालिनी जोशी यांची इन्कलाब कादंबरी, अशोक पारधे यांनी मनोज मुंतशीर यांचा मी भारत आहे हा लेख, ॲड. आनंद मुजुमदार व आदिती कुलकर्णी यांनी १८५७ चे स्वातंत्र्य समर – दक्षिण भारताचे योगदान या पुस्तकातील सुलभा कुलकर्णी लिखित खानदेशचे योगदान या प्रकरणाचे वाचन केले तर अनिलकुमार शाह यांनी कुसुमाग्रज यांच्या दोन कवितांचे संदर्भासह स्पष्टीकरण दिले.
                कार्यक्रमात वाचनाबरोबरच विचार मंथनही झाले. यामुळे स्वातंत्र्य संग्रामातील विविध पैलू, त्याग आणि प्रेरणा यांचा सखोल परिचय सर्वांना झाला.
      कार्यक्रमाच्या शेवटी वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी.ए.अनिलकुमार शाह यांनी मनोगत व्यक्त करत सर्व सहभागी वाचकांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी यांनी केले.
         कार्यक्रमास रोटरी क्लबचे मानद सचिव सुभाष अमळनेरकर, संवाद सचिव पंकज व्यवहारे, संजीव फडणीस, राजेश चौधरी या मान्यवरांसह वाचकांची उपस्थिती होती.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम