स्वा. सै. ज. सु. खडके प्राथमिक विद्या मंदिरात शिक्षक कृतज्ञता समारंभ उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

जळगाव: स्वा. सै. ज. सु. खडके प्राथमिक विद्या मंदिरात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षक कृतज्ञता समारंभ उत्साहात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.

कार्यक्रमात उपशिक्षक व्हणमाने आणि पवार यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.


 

विद्यार्थ्यांनी सांभाळला मुख्याध्यापकांचा आणि शिक्षकांचा पदभार

 

शिक्षक दिनाचे विशेष औचित्य साधत, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकाची भूमिका पार पाडली. विद्यार्थी नैतिक महाजन याने मुख्याध्यापकाची भूमिका बजावली, तर इतर विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून संपूर्ण शाळेचे कामकाज यशस्वीपणे सांभाळले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी संस्कृती सोनवणे हिने केले, तर अनुपा परिवार हिने आभार व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम