स्वीकारार्हता गुण अंगीकारल्यास मिळतो प्रत्येक कामाचा आनंद

शिक्षण परिषदेत डॉ. जगदीश पाटील यांनी साधला शिक्षकांशी संवाद

बातमी शेअर करा...
स्वीकारार्हता गुण अंगीकारल्यास मिळतो प्रत्येक कामाचा आनंद
शिक्षण परिषदेत डॉ. जगदीश पाटील यांनी साधला शिक्षकांशी संवाद : अंजाळे केंद्राची वाघळूद जि.प. शाळेत पार पडली शिक्षण परिषद
यावल – नवीन शैक्षणिक धोरणामुळे अनेक बाबींची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्कृष्ट व्हावे यासाठी अभ्यासक्रम निर्मिती, नाविन्यपूर्ण अध्ययन-अध्यापन आणि योग्य रीतीने मूल्यमापन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षक म्हणून काम करत असताना आलेल्या प्रत्येक कामाचा स्वीकार करायला हवा. प्रत्येक शिक्षकाने स्वीकारार्हता अंगीकारल्यास आपल्या कामाचा आपल्याला नक्कीच आनंद मिळेल, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.
यावल तालुक्यातील वाघळूद येथील जि.प. प्राथमिक शाळेत पार पडलेल्या अंजाळे केंद्राच्या शिक्षण परिषदेत डॉ. जगदीश पाटील यांनी शिक्षकांशी संवाद साधला. केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख गिरीश सपकाळे तर व्यासपीठावर मुख्याध्यापक अमितकुमार पाटील, छोटू मनुरे, वसंत सोनवणे उपस्थित होते. माजी विद्यार्थिनी दिव्या पवार हिने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. शिक्षणक्षेत्रातील नवनवीन प्रवाह यासंदर्भात बोलताना डॉ. जगदीश पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणात असलेल्या विविध बाबींची क्रमाक्रमाने होत असलेली अंमलबजावणी सांगितली. तसेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि हमी आराखडा याविषयी सविस्तर माहिती देऊन स्तर निश्चिती आणि पुरावे ऑनलाईन अपलोड करणे याविषयी प्रोजेक्टरद्वारे माहिती देऊन प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. त्यानंतर निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाची माहिती केंद्रप्रमुख गिरीश सपकाळे व स्वाती महाजन यांनी दिली. केंद्रप्रमुख गिरीश सपकाळे यांनी निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षकांनी करावयाची अंमलबजावणी यासंदर्भात शासन परिपत्रकाची सविस्तर माहिती देऊन सखोल मार्गदर्शन केले. संकलित मूल्यमापनाविषयी अनिता पाटील यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन दीपक वारके यांनी तर आभार अमितकुमार पाटील व वसंत सोनवणे यांनी मानले. शिक्षण परिषदेला अंजाळे शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नमाला चौधरी, निमगावचे मुख्याध्यापक अय्युब तडवी यांच्यासह अंजाळे, वाघळूद, निमगाव, राजोरे, सांगवी खुर्द, बोरावल बुद्रूक, बोरावल खुर्द, टाकरखेडा, भालशिव, पिंप्री या जि.प. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच नूतन विद्यामंदिर अंजाळे व एल.एम.पाटील विद्यालय राजोरे येथील शिक्षक उपस्थित होते.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम