
स्व. आमदार राजीव दादा देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शोकसभेचे आयोजन
स्व. आमदार राजीव दादा देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शोकसभेचे आयोजन
चाळीसगाव : जनसामान्यांचे लाडके लोकनेते आणि माजी आमदार राजीव दादा देशमुख यांच्या निधनानंतर संपूर्ण चाळीसगाव तालुका शोकमग्न झाला आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित शोकसभेचे आयोजन सोमवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता स्व. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव येथे करण्यात आले आहे.
दि. २१ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने स्व. राजीव दादा देशमुख यांचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या निधनाने चाळीसगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याने एक जनतेचा खरा आवाज गमावला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष, संघटना, सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच विविध असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या भावना लक्षात घेऊन ही शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम