हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले; तापी नदीच्या पातळीत वाढ

बातमी शेअर करा...

हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले; तापी नदीच्या पातळीत वाढ

 

जळगाव: जळगाव जिल्ह्यावर गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पावसाच्या जोरदार आगमनामुळे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आज, रविवारी सकाळी धरणाचे १४ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले.

पाण्याची वाढती आवक पाहता, धरणातून तापी नदीपात्रात २८,१७५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे तापी नदीच्या पातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणाचे नियम आणि भविष्यातील नियोजन हतनूर धरणाच्या द्वार परिचालन आणि पूर नियंत्रण नियमांनुसार, दरवर्षी १० ऑक्टोबरपर्यंत धरणात १०० टक्के पाणीसाठा केला जातो. यावर्षीदेखील पूर्ण क्षमतेने साठा करण्याचे नियोजन आहे. सध्या धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे तापी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे, ज्यामुळे नदीकाठावरील निसर्ग अधिकच मनमोहक दिसत आहे. या धरणातून सोडलेले पाणी पुढे शेळगाव बॅरेजमध्ये जमा होते आणि तेथून पुढे त्याचा नियंत्रित विसर्ग केला जातो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम