हद्दपार असूनही घरी वास्तव्य करणारे दोन सराईत गुन्हेगार अटकेत

बातमी शेअर करा...

हद्दपार असूनही घरी वास्तव्य करणारे दोन सराईत गुन्हेगार अटकेत
शनिपेठ पोलिसांची कारवाई ; महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

जळगाव : हद्दपार असतानाही कुठलीही परवानगी न घेता घरी वास्तव्य करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या शनिपेठ पोलिसांनी आवळल्या. तेजस दिलीप सोनवणे आणि सागर उर्फ बिडी सुरेश सपकाळे अशी अटकेत घेतलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे हे दोन्ही गुन्हेगार पूर्वीच हद्दपार करण्यात आले होते. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी विनापरवानगी घरी वास्तव्य करत असल्याचे समजताच शनिपेठ पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तातडीने पथक तयार केले.

गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी गणेशकुमार नायकर, दीपक गजरे, शशिकांत पाटील, गणेश ढाकणे, नवजीत चौधरी व काजोल सोनवणे यांच्या पथकाने संशयितांच्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर दोन्ही गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम