हद्दपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा...

हद्दपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव प्रतिनिधी आदेशाचे उल्लंघन करून शहरात वास्तव्यास असलेल्या एका हद्दपार आरोपीला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. आकाश अरुण दहियेकर (वय ४४) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

दहियेकर याला पोलिसांनी एका वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले होते. असे असतानाही, तो हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, ५ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता पोलिसांनी शहरातील कंजरवाडा येथील त्याच्या घरी धाड टाकली. यावेळी तो घरी मिळून आला. हद्दपारीचा आदेश मोडल्याबद्दल पोलिसांनी दहियेकरला तत्काळ ताब्यात घेतले असून, त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम