
हनी ट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महिलेला अटक
रावेर पोलिसांची सापळा रचून कारवाई
हनी ट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महिलेला अटक
रावेर पोलिसांची सापळा रचून कारवाई
रावेर:- हनी ट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महिलेला रावेर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. एका व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करणाऱ्या या महिलेला तक्रारदाराच्या मदतीने सापळा रचून अटक करण्यात आली.
रावेर तालुक्यातील एका इसमाची २०१८ मध्ये जळगावला जात असताना एका महिलेने ओळख वाढवली. विश्वास संपादन करून तिने त्याला घरी आमंत्रित केले आणि गुंगीचे औषध देऊन त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. त्याचा गुप्त व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार सुरू झाला.
खंडणीसाठी पाच कोटी रुपयांचा करार!
दरम्यान, पीडित व्यक्तीला बदनामीची भीती दाखवत वारंवार पैशांची मागणी केली गेली. या प्रकरणात इसमाने आतापर्यंत ११ लाख रुपये महिलेच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. एवढ्यावरच न थांबता महिलेने फेब्रुवारी २०२४ मध्ये तब्बल पाच कोटी रुपयांचा करारनामा करून घेतला.
पीडित व्यक्तीने अखेर रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि अंकुश जाधव, उपनिरीक्षक प्रिया वसावे, माधवी सोनवणे, महेश मोगरे, सुकेश तडवी आणि श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचला.महिलेने रावेर-बन्हाणपूर मार्गावरील एका दुकानाच्या परिसरात एक लाख रुपये घेण्यासाठी बोलावले. पैसे स्वीकारताच पोलिसांनी तिला रंगेहाथ अटक केली.
अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणांमध्ये अन्य कोणीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम