“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घराघरात फडकणार राष्ट्रध्वज

बातमी शेअर करा...

“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घराघरात फडकणार राष्ट्रध्वज

          *जळगाव दि. 12 ऑगस्ट – भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत १३, १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक घर, दुकान, खाजगी आस्थापना तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या अभियानात सहभागी होऊन आपल्या घरावर व आस्थापनांवर राष्ट्रध्वज लावावा आणि राष्ट्रध्वज लावतानाच्या नियमांचे पालन करावे. तसेच, ध्वजासोबत छायाचित्र काढून ते harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे.

या अभियानात सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन स्वातंत्र्य दिन साजरा करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम