हर घर तिरंगा रॅलीला एल.आर.टी. च्या एन.सी.सी. कॅडेटचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा...
हर घर तिरंगा रॅलीला एल.आर.टी. च्या एन.सी.सी. कॅडेटचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोलाच्या एन.सी. सी. विभागाच्या कॅडेटसने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत शहरामध्ये जनजागृती तसेच रॅली काढून यामध्ये सहभाग घेतला. ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेमागील संकल्पना लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना बिंबवणे हा आहे. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल व्ही. एन. शुक्ला यांच्या मार्गर्शनाखाली तसेच श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वर्षा सुखदेवे व महाविद्यालयाचे एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल म. तिरकर याच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या रॅली द्वारे एन.सी.सी. कॅडेट्सनी भारताच्या राष्ट्रध्वजाचे महत्त्व लोकांना सांगितले. भारताचा राष्ट्रध्वज शांतता, प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे. भारताला स्वतंत्र करतांना अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण गमावले, तिरंगा त्यांच्या अमूल्य बलिदानाचे प्रतिनिधित्व करतो. १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण होतील. या रॅलीची सुरुवात श्री. शिवाजी महाविद्यालय येथून होऊन ११ महाराष्ट्र बटालियन येथे समाप्त झाली. या रॅलीसाठी बटालियनचे सुभेदार मुनीशकुमार, हवालदार महेंद्र राणा,
हवालदार अविनाश, हवालदार विजय, सर्व पीआय स्टाफ तसेच प्रशासकीय कर्मचारी अभिषेक पिंजरकर, अवि उजाडे व सुनील पोघे हे सुद्धा उपस्थित होते. या रॅली नंतर सर्व एन.सी.सी. कॅडेट्सला भारतीय ध्वज देऊन आपल्या घरावर तो फडकावा असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कॅडेट निखिल मोरया, कॅडेट सुरेश ठोसर, कॅडेट आयुष कुलकर्णी, कॅडेट प्रथमेश वसतकर, कॅडेट जय तायडे, कॅडेट वैभव डाखोळे, कॅडेट विधान तिवारी, कॅडेट धनराज जाहीर, कॅडेट शिवम वाघ, कॅडेट वैभव काळपांडे, कॅडेट हर्ष देवगीरकर, कॅडेट ओम भारती, कॅडेट शिवम दुबे, कॅडेट निखिल सभाडिगे, कॅडेट पवन गिरी, कार्पोरल अविनाश वाकोडे, कॅडेट क्रिश करवाडिया या सर्व एन. सी. सी. कॅडेटने परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम