
हर घर तिरंगा’, ‘विभाजन विभीषिका’ व रक्षाबंधन अभियानाबाबत भाजपची कार्यशाळा
हर घर तिरंगा’, ‘विभाजन विभीषिका’ व रक्षाबंधन अभियानाबाबत भाजपची कार्यशाळा
जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीच्या ‘हर घर तिरंगा’, ‘विभाजन विभीषिका स्मरण दिन’ आणि रक्षाबंधन अभियानाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पश्चिम, जिल्हा पूर्व व महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने बलिराम पेठेतील ब्राह्मण सभा हॉल, जळगाव येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेस राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, जळगाव जिल्हा पूर्व अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा पश्चिम अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. रावेर लोकसभा प्रमुख नंदू भाऊ महाजन, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा केतकीताई पाटील, महानगरच्या माजी अध्यक्ष उज्वलाताई बेंडाले, माजी आमदार दिलीप वाघ, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, महानगर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भारतीताई सोनवणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेळा विधानसभा उमेदवार राहिलेले नगरसेवक मनोज दयाराम चौधरी यांनी जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम