
हळदी समारंभात मुलांच्या भांडणात हस्तक्षेप करणाऱ्यावर हल्ला
लोखंडी रॉडने डोक्यात गंभीर मारहाण
हळदी समारंभात मुलांच्या भांडणात हस्तक्षेप करणाऱ्यावर हल्ला
लोखंडी रॉडने डोक्यात गंभीर मारहाण
जळगाव : जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या मुलांच्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिल गिरजू गवळी (वय ४०, रा. मोहाडी) यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री अनिल गवळी हे हळदीच्या कार्यक्रमानंतर घरी जात असताना लहान मुलांमध्ये भांडण सुरू असल्याचे पाहून ते भांडण सोडवण्यासाठी गेले. याचदरम्यान, सुशिल गुणवंत साठे आणि गुणवंत साठे (दोघे रा. मोहाडी) या दोघांना त्याचा राग आल्याने त्यांनी अनिल गवळी यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
याच झटापटीमध्ये सुशिल साठे याने लोखंडी रॉड घेऊन अनिल गवळी यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर जखमी अनिल गवळी यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अनिल गवळी यांच्या तक्रारीनंतर संशयित आरोपी सुशिल गुणवंत साठे आणि गुणवंत साठे या दोघांविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम