हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता विभागीय हातमाग कापड स्पर्धाचे” १९ मार्च रोजी आयोजन

प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे

बातमी शेअर करा...

हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता विभागीय हातमाग कापड स्पर्धाचे” १९ मार्च रोजी आयोजन
प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना शक रोख बक्षिसे
जळगाव,प्रतिनिधी

राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकरांनी उत्पादीत केलेले उत्कृष्ठ वाणाला सम्मान मिळावा या दृष्टीकोनातून मुंबई विभागात “विभागीय हातमाग कापड स्पर्धा” दिनांक १९ मार्च २०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
विभागीय हातमाग कापड स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय बक्षीस पात्र नमून्याला अनुक्रमे रूपये २५,०००/-, रूपये २०,०००/- व रूपये १५,०००/- चे बक्षीस देण्यात येणार आहे.
हातमाग कापडाचे नमुने सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत दाखल करावे. वेळेनंतर आलेले नमुने स्विकारले जाणार नाही. तसेच नमुन्यावर त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, वापरण्यात आलेल्या धाग्याचा प्रकार डिझाईन, रंग व कापडाची विशेषतः असे कापडाचे विवरण किंमतीसह देणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विणकरांनी कमीत कमी १ नग व मिटरमध्ये कमीत कमी २ मिटर कापड स्पर्धेकरीता आणायचे आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई, भोरूका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस, ५ वा मजला, १२८ ब पुना स्ट्रीट, मस्जीद (पूर्व) ४०० ००९, पत्यावर किंवा Email-rddtextiles3mumbai@rediffmail.com, दुरध्वनी क्रमांक :- ०२२ – २३७००६११ यावर संपर्क करावा.
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई हे राज्य शासनाचे कार्यालय असुन सर्व हातमाग विणकरांनी सहभाग घेवून लाभ घेण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम