
हातेड बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
हातेड बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
हातेड बुद्रुक (ता. चोपडा) : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांसाठी एकत्रित महसूल व शासकीय सेवा देणारे समाधान शिबिर हातेड बुद्रुक येथे पार पडले. राजर्षी शाहू महाराज मंगल कार्यालय येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत विविध योजनांचे लाभ आणि धनादेश वाटप केले.
या शिबिरात १३०० ते १४०० नागरिकांनी उपस्थित राहून महसूल विभागासह विविध विभागांच्या योजनांचा लाभ घेतला. महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, महावितरण, कृषी इत्यादी विभागांनी सेवा पुरवल्यामुळे नागरिकांना गावातच प्रशासनाची सेवा मिळाली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागले नाही आणि त्यांच्या वेळेची तसेच पैशांची बचत झाली. शासनाची सेवा थेट गावात उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शिबिराला कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडाचे सभापती नरेंद्र पाटील, माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, संचालक विकी सनेर, रावसाहेब पाटील, किरण देवराज, वसंत आप्पा बाविस्कर, प्रकाश दादा रजाळे, हातेड बुद्रुकच्या सरपंच प्रेरणा सोनवणे, उपसरपंच रामकृष्ण सनेर, शांताराम बाविस्कर, शितल देवराज आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासनातर्फे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक अनिल भवारी (चोपडा ग्रामीण), गटविकास अधिकारी अनिल विसावे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विरेंद्र राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील तसेच महावितरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, सर्व तालुकास्तरीय अधिकारी व मंडळस्तरीय कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत धनगर आणि स्वप्नील कुलकर्णी यांनी केले. शिबिरादरम्यान नागरिकांना गावातच शासकीय सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम