हात उसनवारीच्या पैशांवरुन तिघांकडून प्रौढाला मारहाण

बातमी शेअर करा...

हात उसनवारीच्या पैशांवरुन तिघांकडून प्रौढाला मारहाण
जळगाव : हात उसनवारीने घेतलेले पैसे वेळेत परत न दिल्यामुळे फिरोज सिकंदर तडवी (वय ४५, रा. वाघनगर) याला तिघांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. ही घटना दि. २० रोजी सायंकाळी वाघ नगरात घडली.

याप्रकरणी तालुका पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वाघ नगरात राहणारे फिरोज तडवी यांनी हातउसनवारीने पैसे घेतले होते. घेतलेले पैसे हे वेळेत परत न दिल्यामुळे संशयितांनी दि. २० रोजी सायंकाळी वाघ नगरात जावून तडवी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली होती. दरम्यान, तडवी यांनी तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन अभिषेक गणेश कुलकर्णी (रा. शनिपेठ), हितेंद्र नरेंद्र पाटील (रा. होंडाई शोरुमजवळ) व प्रथमेश तायडे (रा. वाघनगर) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम