
हिंगोणे येथे वीज पडल्याने म्हैस ठार
हिंगोणे येथे वीज पडल्याने म्हैस ठार
अमळनेर : तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे वीज पडून गोठ्यात बांधलेली म्हैस ठार झाल्याची घटना १२ रोजी घडली. हिंगोणे बुद्रुक येथील शेतकरी प्रवीण मखमल पाटील यांची ७५ हजारांची गाभण असलेली म्हैस गोठ्यात बांधलेली होती. १२ रोजी रात्री ९.३० वाजता आलेल्या वादळात वीज पडल्याने म्हशीचा मृत्यू झाला. १३ रोजी तलाठी प्रशांत पवार व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तर तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम