हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे-शिवसेनेचा जळगावात तीव्र निषेध

बातमी शेअर करा...

हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे-शिवसेनेचा जळगावात तीव्र निषेध

सरकारच्या निर्णयाची प्रतीकात्मक होळी

जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केलेली अट रद्द करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी रविवारी जळगावात तीव्र आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारच्या निर्णयाची प्रतीकात्मक होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

“मराठी माती, मराठी भाषा”, “हिंदी सक्ती हद्दपार”, “मराठी शाळा, मराठी अभ्यास” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या निर्णयाची प्रतिकात्मक प्रत जाळून संतप्त भावना व्यक्त केल्या.

“भाषेची सक्ती म्हणजे मुलांवर अन्याय”

मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले की, प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांवर हिंदी भाषेची सक्ती करणे म्हणजे त्यांच्या बौद्धिक आणि भावनिक स्वातंत्र्यावर आघात आहे. महाराष्ट्रात शिक्षणाचे माध्यम मराठीच असायला हवे, असे ठाम मत यावेळी मांडण्यात आले. कोणतेही शैक्षणिक धोरण हे स्थानिक भाषिक अस्मिता आणि संस्कृतीविरोधात नसावे, असा ठाम संदेश आंदोलनातून देण्यात आला.

शासन निर्णय मागे घेत न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

शासनाने हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या आंदोलनात मनसेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, जितेंद्र पाटील, ॲड. सागर शिंपी, ऐश्वर्य श्रीरामे, संदीप मांडोळे, गणेश नेरकर, विकास पाथरे, दीपक राठोड, राजू बाविस्कर, राहुल चव्हाण, अनिताताई कापुरे, नेहा चव्हाण, लक्ष्मीताई भील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल सोनटक्के, विशाल सोनार, साजन पाटील, अविनाश जोशी, प्रदीप पाटील, रोहित माळी, मनोज लोहार, विलास सोनार, राहुल चौधरी, भूषण पाटील, दिनेश कलार, मंगेश भावे, शुभम सैनी, नौशांक चौधरी, लोकेश ठाकूर यांचाही सहभाग होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम