
हितवर्धन सोनवणे ‘सुबे’ संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष
हितवर्धन सोनवणे ‘सुबे’ संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष
जळगाव: सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘राज्य अभियंता संघटना (सुबे)’ च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी हितवर्धन राहुल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘सुबे’ संघटनेचे राज्य उपाध्यक्ष इंजिनियर राहुल सोनवणे यांनी या नियुक्तीची घोषणा केली.
हितवर्धन सोनवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत. अभियंत्यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी हितवर्धन सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील ‘सुबे’ संघटना भविष्यात महत्त्वपूर्ण काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला नवीन दिशा मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम