हॉटेलमध्ये बिल वादात मध्यस्थी करणे तरुणाला पडले महागात

बातमी शेअर करा...

हॉटेलमध्ये बिल वादात मध्यस्थी करणे तरुणाला पडले महागात

 

जळगाव: शहराच्या भुसावळ रोडवरील हॉटेल जान्हवीसमोर बिलावरून सुरू असलेल्या वादामध्ये मध्यस्थी करणाऱ्या निलेश दिलीप पाटील (वय ४०, रा. कुसुंबा) या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत निलेश पाटील गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २.३० वाजता घडली. निलेश पाटील हे हॉटेलजवळून जात असताना, काही तरुणांचा हॉटेलच्या मॅनेजरसोबत बिलावरून वाद सुरू होता. निलेश यांनी ‘काय कुटाणे करता?’ असे विचारताच, आरोपी संतप्त झाले. त्यांनी काचेची बॉटल आणि स्टीलच्या जगने निलेश यांच्या तोंडावर मारले. ते खाली पडल्यावर त्यांना लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली.

मारहाण करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी निलेश पाटील यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शशिकांत पाटील करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम