११ वर्षीय मुलीवर अत्याचार, उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू

बातमी शेअर करा...

बरेली, उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटदुखीच्या उपचारासाठी रुग्णालयात गेलेली ११ वर्षांची मुलगी ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत उघड झाले. डॉक्टरांनी तिची प्रसूती केली, मात्र जन्मानंतर काही वेळातच नवजात बाळाचा मृत्यू झाला.

शेजाऱ्याने केला अत्याचार

जेव्हा या मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार सांगितला. गावात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. आरोपीला दोन मुले आहेत.

पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितले की, आरोपी तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी घेऊन जायचा आणि तिथे तिच्यावर अत्याचार करायचा. त्याने तिला याबद्दल कुणालाही सांगितले तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली होती. तसेच, त्याने तिचे व्हिडिओही बनवले होते. यामुळे मुलीने भीतीपोटी हा प्रकार कुणालाही सांगितला नाही.

आठ महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार सुरू असल्याचेही समोर आले. पोटात दुखायला लागल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. कुटुंबियांनी तात्काळ आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम