बातमीदार | दि ११ जानेवारी २०२४
१२ जानेवारीपासून आशा गटप्रवर्तकांचा बेमुदत संप
चोपडा तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक संपावर जाणार आहेत
महाराष्ट्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी आशा व गटप्रवर्तक कृती समितीला अशांना सात हजार रुपये पगार वाढ मदतनिसांना दहा हजार रुपये तसेच एपीएल बीपीएल भेद राहणार नाही.
गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे वेतन म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियान कडे पाठपुरावा करणे आशा गट प्रवर्तक याना प्रलंबित भाऊबीज देणे साठी घेणे बाबत जी आश्वासने दिली ती पूर्ण करा.
अन्यथा संपावर जाणार असा इशारा चोपडा येथील तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाला तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांनी दिला आहे.
हे वाचा👇
कोळी समाजाचे आंदोलनास आमदार सोनवणे दांपत्याची भेट
असे निवेदन प्राथमिक आरोग्य स्तरावर, उपकेंद्र स्तरावर दिली जाणार आहेत अशी माहिती आशा व गटप्रवर्तक संघटनेचे नेते कॉ. अमृत महाजन, मीनाक्षी सोनवणे, वंदना पाटील, वंदना सोनार, सीमा मराठे, विद्या सनेर, शीला सपकाळे,
रेखा पाटील, मीनाक्षी पाटील, निर्मला साळुंखे, उषा बाविस्कर, सरला शिरसाट, माया धनगर, नजमा तडवी, ललिता चित्रकथी, छाया पाटील, संजना विसावे, दिपाली बाबा, मनीषा बारेला यांनी दिलेला आहे.
हे वाचा👇
अनेर परीसरात ५ कोटी ६६ लाखाच्या कामांचे थाटात आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते भुमिपुजन
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम