
१४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवले
१४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवले
जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची गंभीर घटना ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडित विद्यार्थिनी केवळ १४ वर्षांची असून ती अल्पवयीन आहे. एका अज्ञाताने तिला आमिष दाखवून किंवा फूस लावून तिचे अपहरण केले. ही बाब लक्षात येताच मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम