१५ वी हॉकी इंडिया सब-ज्युनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जळगावच्या दोन खेळाडूंची निवड

बातमी शेअर करा...

१५ वी हॉकी इंडिया सब-ज्युनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जळगावच्या दोन खेळाडूंची निवड

जळगाव | येत्या ३ ते १४ जुलै दरम्यान रांची येथे होणाऱ्या १५ व्या हॉकी इंडिया सब-ज्युनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ पुणे येथे निवडण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी जळगाव जिल्ह्यातून दोन प्रतिभावान खेळाडूंनी आपली निवड निश्चित केली आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे २९ मे रोजी आयोजित कार्यक्रमात या खेळाडूंना सन्मानपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये रितीमा पंचनाल बारेला आणि रशीला बन्सीलाल बारेला यांचा समावेश असून, त्या दोघीही शासकीय आश्रम शाळा, वैजापूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील विद्यार्थीनी आहेत.

 

महाराष्ट्र हॉकीच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना हॉकी स्टिक प्रदान करून गौरविण्यात आले. यासोबतच हॉकी जळगावतर्फे फारूक शेख यांनी त्यांच्या क्रीडा तयारीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.

 

या प्रसंगी हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख, सहसचिव हिमाली बोरोले, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे, संचालिका वर्षा सोनवणे तसेच पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू किरण भिसे हे मान्यवर उपस्थित होते.

या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, या खेळाडूंना यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम