
१६ वर्षानंतर महिलेने दिला जुळ्यांना जन्म ; दुर्दैवाने मातेचा काही तासांत मृत्यू
१६ वर्षानंतर महिलेने दिला जुळ्यांना जन्म ; दुर्दैवाने मातेचा काही तासांत मृत्यू
पाचोरा शहरातील घटनेने शहरात प्रचंड हळहळ
पाचोरा प्रतिनिधी
येथील माहेरवाशी ज्योती ज्ञानेश्वर चौधरी वय – ३७ या सावनेकर हॉस्पिटल येथे एक मुलगी व एक मुलगा अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला.
दोन्ही बाळ जन्माला आल्यानंतर ३ तासात बाळाला जन्म देणारी आई ज्योती ज्ञानेश्वर चौधरी हिला सायंकाळी ७ वाजता हृदय विकाराचा झटका आल्याने ज्योती चौधरी यांचे दुःखद निधन झाले. या घटनेने महिलेच्या पती आई, वडील, भाऊ यांनी प्रचंड आक्रोश केला. लग्न होऊन १६ वर्ष पूर्ण झाले तरी बाळ जन्माला येत नहोते. म्हणून ज्योतीच्या पतीने व आई वडिलांने खूप स्टेटमेंट केली. पती पत्नीला व दोन्हीच्या आई वडिलांना प्रचंड आनंद झाला. ज्योतीने १९ मार्च २०२५ रोजी एक मुलगा व एक मुलगी असे दोन बाळांना जन्म दिला आणि दोन्ही पती पत्नीला व आई वडिलांना आणि ज्योतीच्या दोन्ही भावाना खूप आनंद झाला.
बाळच्या तीन तासानंतर त्या आनंदात दुःखाचा डोगर कोसळला. बाळाच्या आईला अचानक हृदय विकारचा झटका आल्याने बाळाच्या आईचे निधन झाले. या घटने मुळे शहरात प्रचंड हळहळ व्यक्त झाला.
ही घटना म्हणजे मराठी चित्रपट माहेरची साडी या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल ही जन्माला येते आणि तिच्या आईचे निधन होते. त्यास प्रकारे ही दुर्दैवी घटना पाचोरा बाहेरपुरा भागात घडलीय, या घटनेमुळे ज्योतीच्या माहेरी व सासरच्या परिवारावर दुःखाचा डोगर कोसळला आहे. २० मार्च रोजी सकाळी १० वाजता ज्योती यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम