
१९ वर्षाच्या युवतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
१९ वर्षाच्या युवतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
कासोदा, ता. एरंडोल : येथील पांडे नगरमधील रहिवासी संजय धना शिवदे यांची पुतणी दीपाली अशोक शिवदे (वय १९) हिने काल रात्री २ वाजेच्या सुमारास बांभोरी खुर्द शिवारातील शैलेश सोनार यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
मुलीचे काका संजय शिवदे यांनी याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी ७.३० वाजता खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या युवतीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजले नाही. तपास स.पो.नि. नीलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दत्तू खुळे करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम