
२० मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
ईच्छुक उमेदवारांना सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मॉडल करिअर सेंटर, जळगाव आणि राजश्री शाहु खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (1.1.) बांभोरी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२० मार्च, २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये जैन इंरिगेशन प्रा.लि, बांभोरी, हिताची अॅस्टीमो ब्रेक, बांभोरी व के. के कॅन, जळगाव असे नामांकित आस्थापनांचा सहभाग आहे.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पात्रता धारण केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर लॉग-इन करुन रिक्तपदांना अॅल्पाय करायचे आहे. तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्र व बायोडाटासह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर रहावे.
याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ०९.४५ ते संध्या.०६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक ०२५७२९५९७९० वर संपर्क साधावा असे आवाहन श्री. संदिप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम