२४ सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काची नोकरी द्या

नगर पालिकेसमोर युनियनचे साखळी उपोषण सुरू

बातमी शेअर करा...

२४ सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काची नोकरी द्या

नगर पालिकेसमोर युनियनचे साखळी उपोषण सुरू

शेगाव – नगरपरिषदेतील २४ सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना लाड कमिटीचे अनुषंगाने वारसा हक्काची नोकरी मिळण्यासाठी नगरपालिकेसमोर १७ मार्चपासून सफाई कामगार युनियन कडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
सदर सेवानिवृत्त सफाई कर्मचारी यांच्या वारसदारांना लाड कमिटीच्या शासन निर्णयाप्रमाणे आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन मुंबई यांच्याकडे सदरील विषया संदर्भात वारसदारांनी केलेल्या नोकरीच्या अर्ज नुसार अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटने द्वारे वारंवार लेखी स्वरूपात पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही अद्याप पर्यंत त्यांच्या पदरी निराशाच येत आहे असे असताना याकडे मात्र शासनाचे साथ दुर्लक्ष दिसून येत आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाद्वारे या गंभीर बाबीवर शासन निर्णयाप्रमाणे नोकरी देऊन न्याय द्यावा असे आदेशित केले असता प्रधान सचिव नगर विकास विभाग यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. या प्रकरणावर अर्जदार वारस १७ मार्च २०२५ पासून नगरपालिकेच्या समोर साखळी उपोषणाला बसले आहेत त्यामुळे नगर परिषदेने २४ सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ वारसा हक्काची नोकरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अखिल भारतीय मजदूर काँग्रेस युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक, राष्ट्रीय सदस्य राहुल टाक, प्रदेश निरीक्षक ललित टाक, प्रदेशाध्यक्ष लोकेश सारवान, लखन पीवाल, राम धंढोरे, शुभम खरारे, खुशाल सारवान, विजय सारवान, भिकू सारवान, शुभम चावरे, संदीप बागडे, अमर ढढोरे, रामू सारवान, कैलास पीवाल, पप्पू चंडाले, कमल गोयर यांच्यासह वाल्मीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम