
२७ रोजी वीर गुर्जर सेने ची बैठकीचे आयोजन
२७ रोजी वीर गुर्जर सेने ची बैठकीचे आयोजन
जळगाव (मंगल बी. पाटील):- गुर्जर समाजाची संस्कृती टिकवणे, समाज संघटन करणे, गावपातळीवरचे अन्यायग्रस्त समाज बंधू – भगिनींना न्याय मिळवून देणे साठी प्रयत्न करणे, उपवर मुलं – मुलींचे लग्न जुळविनेसाठी प्रयत्न करणे, परिचय मेळावे आयोजित करणे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे आयोजित करणे, समाजातील घटस्फोटाचे प्रमाण कमी करणे, सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे, गावा गावात वीर गुर्जर सेना ची स्थापना करणे साठी एक देशव्यापी चळवळ उभी करायची असल्याने, त्यासाठी दोडे गुर्जर व रेवे गुर्जर बंधू – भगिनींचे अनमोल सहकार्य अपेक्षित आहे . त्यासाठी दि. २७ जुलै २०२५ रविवारी दुपारी तीन वाजता हॉटेल रावसाहेब आयोध्या नगर , पिंप्री खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथे गुर्जर समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वीर गुर्जर सेना ची राष्ट्रीय कार्यकारिणी व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी गठीत करावयाची असल्याने समाज बंधू – भगिनींनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन वीर गुर्जर सेनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार हेमंत पाटील व मान्यवरांकडून करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम