
४० हजार रुपये व रेनकोट लांबवला, घरमालक बाहेरगावी असताना चोरट्यांची कारवाई
४० हजार रुपये व रेनकोट लांबवला, घरमालक बाहेरगावी असताना चोरट्यांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील पिंप्राळा परिसरात घरमालक कामानिमित्त बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ४० हजारांची रोकड आणि एक हजाराचा रेनकोट लंपास केला. ही घटना १५ ते १७ मेदरम्यान घडली असून, रामानंद नगर पोलिस ठाण्यात ६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल डेविड फिलीप (वय ४०, रा. पिंप्राळा) हे खासगी नोकरीच्या निमित्ताने १५ मे रोजी चोपडा येथे सासऱ्यांकडे गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाट उचकले. कपाटातील रोख ४० हजार रुपये आणि १ हजार रुपये किमतीचा रेनकोट असा एकूण ४१ हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला.
१७ मे रोजी फिलीप घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम