७० व्या कामगार नाट्य स्पर्धेत पिंप्राळा केंद्राचे कोहम प्रथम
ललित कला भवन मेहरुण वसाहतचे ‘बातमी तशी जुनी पण’ चतुर्थ
७० व्या कामगार नाट्य स्पर्धेत पिंप्राळा केंद्राचे कोहम प्रथम
ललित कला भवन मेहरुण वसाहतचे ‘बातमी तशी जुनी पण’ चतुर्थ
जळगाव (प्रतिनिधी)
नुकत्याच नाशिक येथे झालेल्या ७० व्या कामगार नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत जळगावच्या कलावंतांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत जळगावच्या कलावंतांनी दोन सांघिक पारितोषिकांसह ११ वैयक्तिक पारितोषिके पटकावली आहेत.
जाहीर झालेल्या निकालात कामगार कल्याण केंद्र पिंप्राळा यांचे कोहम हे नाटक प्रथम आले आहे तर ललित कला भवन, मेहरुण वसाहतचे बातमी तशी जुनी पण या नाटकास उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक मिळाले आहे. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये दिग्दर्शन प्रथम अमोल जाधव (कोहम), पुरुष अभिनय द्वितीय पारितोषिक प्रितीश पाटील (गालव, कोहम), तृतीय क्रमांक अम्मार मोकाशी (अनिकेत, बातमी तशी जुनी पण), गुणवत्ता प्रमाणपत्र महेश होनमाने (नाना, एक्सपायरी डेट, कामगार कल्याण केंद्र भुसावळ), आकाश बाविस्कर (सत्तार, हमीदाबाईची कोठी, कामगार कल्याण केंद्र पाचोरा), महिला अभिनय द्वितीय क्रमांक प्रणिता शिंपी (माधवी, कोहम), गुणवत्ता प्रमाणपत्र ऐश्वर्या खोसे (म्हातारी, एक्सपायरी डेट, कामगार कल्याण केंद्र भुसावळ), उत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांक भावेश पाटील (कोहम), तृतीय क्रमांक रसिका कुलकर्णी (बातमी तशी जुनी पण), उत्कृष्ट पार्श्वसंगीत प्रथम सागर सदावर्ते (कोहम), आशिष राजपूत (बातमी तशी जुनी पण) अशी पारितोषिके पटकावली आहेत.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून ईश्वर जगताप, विजय रावळ, स्नेहल साखरे यांनी काम पाहिले. जळगावच्या पारितोषिक विजेत्या संघ व कलावंतांचे कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी, कामगार कल्याण निरीक्षक भानुदास जोशी, केंद्र संचालक नरेश पाटील, किशोर पाटील, आर.एस.शेख यांनी अभिनंदन केले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम