
ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया; भुसावळच्या अलका भोळेंना जीवनदान
ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया; भुसावळच्या अलका भोळेंना जीवनदान
जळगाव, जळगावच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये डॉ. निलेश किनगे आणि त्यांच्या टीमने मेंदूतील रक्तवाहिनीच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या मदतीने भुसावळ तालुक्यातील आचेगावची गृहिणी अलका रवींद्र भोळे यांना नवसंकल्पने जीवनदान दिले आहे.
अलका भोळे यांना गेल्या एका महिन्यापासून डाव्या डोळ्याच्या पापण्या पडून दिसायला त्रास होत होता. त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला, परंतु आजाराचे नेमके निदान होऊ शकले नाही. शेवटी ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर तपासणीत डोक्यातील रक्तवाहिन्यांचा असामान्य फुगा फुटून रक्तस्राव झाल्याचे गंभीर निदान झाले.
डॉ. निलेश किनगे यांनी तात्काळ मेंदूची अँजिओग्राफी करून डाव्या धमनीत मोठा फुगा असल्याचे शोधले. फुग्याची ‘मान’ मोठी असल्याने त्यांनी फ्लो डायव्हर्टर स्टेंट टाकण्याचा निर्णय घेतला. जर्मनीत तयार झालेला सिल्क व्हिस्टा स्टेंट वापरून फुगा पूर्णपणे बंद करण्यात आली. या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. विनोद किनगे, रेडिओलॉजिस्ट डॉ. वैजयंती किनगे आणि न्यूरोसर्जन डॉ. संजीव हूजुरबाजार यांचे सहकार्य लाभले.
अशा गुंतागुंतीच्या मेंदू शस्त्रक्रिया पूर्वी फक्त पुणे-मुंबईसारख्या महानगरांमध्ये शक्य होत्या. मात्र, गेल्या १० वर्षांपासून जळगावच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मेंदू-संबंधित आजारांचे अचूक निदान आणि यशस्वी उपचार होत असल्याचे डॉ. किनगे यांनी सांगितले. हे रुग्णालय मेंदू-संबंधित सर्व आजारांसाठी विश्वसनीय ठरले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम