ॲडव्होकेट इंडियन प्रीमियर लीगसाठी ॲड.सुरज जहांगीर यांची निवड
माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
ॲडव्होकेट इंडियन प्रीमियर लीगसाठी ॲड.सुरज जहांगीर यांची निवड
माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव I प्रतिनिधी
मुंबई व लोणावळा येथे १७ जानेवारी पर्यंत सुरू असलेल्या ॲडव्होकेट इंडियन प्रीमियर लीग (एआयपीएल) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी जळगावच्या ॲड. सुरज जहांगीर यांची लखनऊ नबाब या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेतील ॲडव्होकेट विविध संघाकडून खेळणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन यांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय जीवनापासून विद्यापीठ पातळीपर्यंत तसेच ॲडव्होकेट जिल्हा संघापासून राज्यपातळीपर्यंत क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून ॲड. सुरज यांनी उल्लेखनीय कामगिरी करत ठसा उठविला आहे.
रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे ते माजी अध्यक्ष असून सामाजिक प्रकल्प व उपक्रमांच्या मदतीसाठी रोटरी प्रीमियर लीग या स्पर्धेची सुरुवात त्यांनी केली. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या अनेक स्पोर्ट्स इव्हेंटचे ॲड.सुरज यांनी नेतृत्व केले आहे.
ॲड. जहांगीर व संध्या जहांगीर-चौधरी यांचे ते सुपुत्र आहेत. गिटारवादक, गायक, ढोलवादक, सूत्रसंचालक, निवेदक, खेळाडू, संघटक, प्रभावी वक्ता ते असून त्यांचे मराठी, इंग्रजी व हिंदी या तीनही भाषांवर प्रभुत्व आहे. नवीपेठ मित्र मंडळाचे पदाधिकारी म्हणून ही ॲड.सुरज सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम