
1 कोटी 15 लाखांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडून मनोज वाणीला बेड्या
1 कोटी 15 लाखांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडून मनोज वाणीला बेड्या
जळगाव : जुन्या बांधकामाच्या घराचा सौदा करून तब्बल 1 कोटी 15 लाख रुपये उकळूनही मिळकत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मनोज लिलाधर वाणी (रा. जिल्हा परिषद कॉलनी) याला आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली.
धरणगावचे बांधकाम व्यावसायिक सुनील चौधरी यांच्या फसवणुकीचा प्रकार शहरात खळबळजनक ठरला आहे. जळगाव महापालिका हद्दीतील जुन्या घराच्या सौद्यासाठी चौधरी यांनी भरघोस रक्कम देऊनही त्यांना ना मिळकत मिळाली ना पैसे परत. परिणामी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणात मनोज वाणी याच्यासह तब्बल १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाणीला शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तपास सपोनि प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम