१० वी पास तरुणही करू शकतात नोकरीसाठी अर्ज.

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील मोठे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर जाताना दिसत आहे, त्यातच राज्यातील तरुणांना अजूनही नोकरी नाही, मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळे नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

EXIM बँक, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
EXIM बँक

पोस्ट – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक.
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, B.E., B.Tech, MBA
एकूण जागा – 45
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2022
तपशील – www.eximbankindia.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. current openings मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
———————————————-

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई
विविध पदांच्या 17 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor
शैक्षणिक पात्रता – M.D./ D.M/ DNB/ M.CH/ MDS / किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदव्युत्तर पदवी, अनुभव
एकूण जागा – 14
———————————————

दुसरी पोस्ट – वैज्ञानिक अधिकारी / Scientific Officer
शैक्षणिक पात्रता – ग्रंथालय आणि माहिती विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50 % गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदव्युत्तर पदवी आणि 5 ते 7 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 1
तिसरी पोस्ट – तंत्रज्ञ / Technician
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण, ITI / डिप्लोमा, 1 ते 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 2
———————————

नोकरीचं ठिकाण – मुंबई, गुवाहाटी, विझाज
या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2022
तपशील – tmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. )

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम