रोटरी जळगाव सेंट्रलचे 13 नवीन व्यक्तींना प्रांतपाल डॉ. झुनझुनवाला यांच्या हस्ते सदस्यत्व

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 24 ऑगस्ट 2022 | जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलचे 13 नवीन व्यक्तींना रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या हस्ते सदस्यत्व प्रदान करण्यात आले.

BJP add

गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये प्रांतपालाच्या अधिकृत क्लब भेट व मेंबरशिप डेव्हलपमेंट मंथ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर सह प्रांतपाल, डॉ. मुर्तुझा अमरेलीवाला, अध्यक्ष विपुल पारेख, मानद सचिव रविंद्र वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात राजेश अग्रवाल, प्राचार्य गोकुळ महाजन, सुहास वाणी, अजय एस.जैन, संजय तोतला, शामलाल कुकरेजा, पंकज लढे, राजेश राठी, रविंद्र पंजाबी, ॲड. केतन ढाके, राजेश काबरा, समर्थसिंग पाटील, महेश गादोदिआ आदिंना सदस्यत्व देण्यात आले.

यावेळी प्रांतपाल डॉ. झुनझुनवाला यांनी 117 वर्षानंतर रोटरीत प्रथमच आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी महिला विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरही महिला सदस्यांची संख्या वाढावी व त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित करावे. गरजूंच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच रोटरीचे कार्य असून त्यांनी रोटरी फाऊंडेशनचे महत्त्व सांगितले. जेष्ठ सदस्यांचा अनुभव व नवीन, तरुण सदस्यांच्या संकल्पना, तंत्रज्ञान, उत्साह या दोघांचा संगम आवश्यक आहे. तो रोटरी जळगाव सेंट्रलमध्ये दिसून येतो असे प्रतिपादन केले.

मानद सचिव रविंद्र वाणी यांनी कार्यअहवाल सादर केला. मेंबरशीप कमेटीचेअरमन मिलन मेहता यांनी सूत्रसंचालन व नवीन सदस्यांचा परिचय करुन दिला. प्रांतपालांचा परिचय डॉ. मुर्तुझा अमरेलीवाला यांनी करुन दिला. संतोष अग्रवाल, महेंद्र रायसोनी, कल्पेश दोशी, रविंद्र वाणी यांचा पॉल हॅरिस फेलोशिपबद्दल सन्मान करण्यात आला. मेंबरशिप कमेटीचे सर्व सदस्य व शिफारस करणाऱ्या सदस्यांचा प्रांतपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र व नीता जैन यांचे सुपुत्र डॉ. मयुर जैन यांची मुंबईतील टॉप 10 डॉक्टरांमध्ये नोंद झाल्याबद्दल त्यांना सन्मानीत करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम