स्थानकावर आढळला १५ फुट लांब अजगर !
बातमीदार | १३ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक रेल्वे स्थानकाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात पण काही काही घटना स्थानकावर घडल्याने अनेक प्रवाशांची तारांबळ देखील होत असते. अशीच एक घटना नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात आज सकाळी घडली आहे. स्थानकावर चक्क १५ फूट लांब अजगर आढळून आला. त्यामुळे लोकल पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची काहीवेळ घाबरगुंडी उडाली. काही नागरिकांनी प्राणीमित्र संघटनेला फोन करून याची माहिती दिली. त्यांनतर सर्पमित्र स्टेशनवर दाखल झाले आणि त्यांनी अजगराला पकडून सुरक्षितस्थळी सोडून दिलं. दरम्यान हा अजगर पाहण्यासाठी प्रवाशांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.
काही दिवसांपूर्वी दादरमधील महात्मा गांधी स्वीमिंग पूलमध्ये मगरीचं पिल्लू आढळल्यामुळे गोंधळ उडाला होता. ही घटना ताजी असताना जुईनगर स्टेशन परिसरात अजगर सापडल्यामुळे शहरात भीतीच वातावरण पसरलं आहे. महापालिकेच्या स्वीमिंग पूलमध्ये पहाटेच्या सुमारास २ फूट लांब मगरीचं पिल्लू पोहताना आढळून आलं होतं. त्यांनतर तज्ज्ञाच्या मदतीने मगरीच्या पिल्लाला सुखरून पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. त्यांनतर याची बरीच चर्चाही झाली. दरम्यान शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असे हिंस्र सरपटणारे प्राणी आढळत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम