
राज्यातील १५ आमदार बाद होत यांची येणार सत्ता ; राज्यात नवा दावा !
दै. बातमीदार । १२ एप्रिल २०२३ । गेल्या काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भल्या पहाटे घेतलेला शपतविधी आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि शिंदे गटावर असलेली अपात्रतेची टांगती तलवार यामुळे राजकारणात कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतच अजित पवार पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांबाबतचे एक ट्विट केले आहे. दमानिया यांनी केलेल्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या ट्विटद्वारे दमानिया यांनी जणू भाजपचा पुढील प्लॅनचं सांगितला आहे. यामुळे दमानिया यांनी केलेले हे ट्विट चांगलचं व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील दमानिया यांनी भाजप आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबत सोशल मीडियावरून भाष्य केले होते.
आपल्या ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणतात,”आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत.. तेही लवकरच बघू.. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची” दमानिया यांनी केलेलं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच
बघू…..
आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 11, 2023
अजित पवार यांनी भाजपसोबत घेतलेल्या त्या शपथविधीमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यानंतरच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येऊ शकले. सध्याची राजकीय परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. एकेकाळी मित्र असलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना आता भाजपासून दूर आहे. अशात राज्यात नेमके कोणत राजकीय समीकरण असणार हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे दमानिया यांनी केलेलं ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम