१६ आमदारांची राजकीय तिरडी बांधली ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शिवसेना पक्षात सुरु असलेल्या सत्तासंघर्षवर लवकरच निर्णय होण्याची दाट शक्यता असतांना यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदार अपात्र ठरतील, याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांची राजकीय तिरडी बांधलेली आहे, फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे, संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी संजय राऊत दिल्ली येथे आहे. येथे आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून त्यांनी निर्णय घेतला नाही तर संसदीय राजकारणाच्या इतिहासात त्यांचे नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिले जाईल.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे सरकार हे फसवणुकीतून निर्माण झालेले सरकार आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांना पैसे मिळाले असतील किंवा त्यांना ईडी-सीबीआयची भीती वाटत असेल. त्यामुळे हे आमदार सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेलेत. ईडी आणि सीबीआयची भीतीपोटी आणि पैशांपोटी अनेक आमदार भाजपसोबत आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होणार, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम