१७ न्यायाधीशांची झाली नियुक्ती !
बातमीदार | १९ ऑक्टोबर २०२३
दिल्लीसह आठ उच्च न्यायालयांमध्ये बुधवारी ११ न्यायिक अधिकारी आणि सहा वकिलांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात चार वकिलांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. तीन न्यायिक अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केरळ उच्च न्यायालयात तीन न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अन्य दोघांची दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. छत्तीसगड आणि कर्नाटक उच्च न्यायालयांमध्ये प्रत्येकी एका वकिलाला अतिरिक्त न्यायाधीश करण्यात आले. गुजरात उच्च न्यायालय आणि त्रिपुरा उच्च न्यायालयात प्रत्येकी एक न्यायिक अधिकारी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. आणखी एका न्यायिक अधिकाऱ्याला त्रिपुरा उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती आणि बदल्यांमधील दिरंगाईबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर या नियुक्त्या झाल्या आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम