रेल्वे पूल कोसळून १७ कामगारांचा दुर्देवी मृत्यू

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ ऑगस्ट २०२३ | देशभरात अनेक राज्यातील महामार्ग व भव्य पुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे. तर नुकतेच मिझोराममध्ये बुधवारी बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून 17 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वृत्तसंस्था पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की, मिझोरामची राजधानी आयझॉलपासून 21 किमी अंतरावर असलेल्या सैरांगमध्ये सकाळी 10 वाजता हा अपघात झाला.

घटनेच्या वेळी पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. ​​​​​​मिझोरमचे मुख्यमंत्री जोराम थांगा यांनी अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रशासन मदत कार्य करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसचे जखमींच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. तिसऱ्या आणि चौथ्या पिलरमधील गर्डर 341 फूट खाली कोसळला पुलामध्ये एकूण चार पिलर आहेत. व्हडिओमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या पिलरमधील गर्डर तुटल्याने खाली पडल्याचे दिसत आहे. सर्व मजूर याच गर्डरवर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची 104 मीटर म्हणजे 341 फूट आहे. म्हणजे हा पूल कुतूबमिनारापेक्षाही उंच आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम