19 वर्षीय तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा...

19 वर्षीय तरुणाची आत्महत्या

पाचोऱ्यातील राजीव गांधी कॉलनीत दुर्दैवी घटना 

 

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील राजीव गांधी कॉलनीत (भडगाव रोड, शक्तीधामजवळ) 19 वर्षीय तरुणाने बहिणीच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना 5 मे 2025 रोजी घडली. बारावीच्या निकालात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत तरुणाचे नाव भावेश प्रकाश महाजन (वय 19, रा. एरंडोल) असे आहे. भावेश एरंडोल येथील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. अलीकडेच त्याने बारावीची परीक्षा दिली होती.

गेल्या 15 दिवसांपासून तो पाचोऱ्यातील राजीव गांधी कॉलनीत बहिणीच्या घरी राहत होता. 4 मे रोजी सायंकाळी त्याची बहीण आणि पाहुणे पुण्याला लग्न समारंभासाठी गेले होते. 5 मे रोजी सकाळी 10 वाजता भावेश पाचोऱ्यातील रेल्वे स्टेशन रोडवरील दुसऱ्या पाहुण्यांच्या दुकानावर गेला होता.दुपारी 12 वाजता दुकान बंद करून तो बहिणीच्या घरी परतला. दुपारी 1 वाजता बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला,

ज्यात भावेशला 42 टक्के गुण मिळाले. यामुळे निराश झालेल्या भावेशने बहिणीच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, शहरातील दुसऱ्या बहिणीकडून त्याच्यासाठी जेवणाचा डबा येत होता. डब्यासाठी बहीण त्याला फोन करत होती, पण त्याने फोन उचलला नाही.

अखेर पाहुण्यांनी शेजारील मित्राला घरी जाऊन पाहण्यास सांगितले. तेव्हा भावेशने गळफास घेतल्याचे आढळले. त्याला तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम