१९४ मिलीयन भारतीय कुपोषीत जीवन जगतायेत – प्रा. वैशाली पाटील

लोकशाही उत्सवात मताधिकारात फक्त ५०% लोकाचा सहभाग. अजुन ही ५० % लोकात जनजागृती नाही

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | १२ एप्रिल २०२४ | धुळे – आनंद नगर येथे, लोकसभा निवडणूक २०२४ आमचे भविष्य आमचं मत अतंर्गत “मुंबई विधायक भारती” संघटनेचे अध्यक्ष मा. संतोष शिदे , महाराष्ट्र शासन बालआयोग सदस्य – महिला व बालविकास विभाग अंतर्गत बालहक्का बाबत३५ जिल्ह्यात जनजागृती करणारी चळवळ चालू आहे. याचा भाग म्हणून आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदे तर्फे अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रबोधन परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष व विधायक भारती धुळे जिल्हा सदस्य सायकोलाँजिस्ट प्रा. वैशाली पाटील यांनी लोकसभा निवडणूक बाबत जनजागृती केली.

भारतात आत्तापर्यंत १७ निवडणुका झाल्या. निवडणूक लढणारे पक्ष पहिल्या निवडणुकीत १९ होते. आणि २०१९ च्या निवडणुकीत ६७४ राजकीय पक्ष होते. पण निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे पक्ष फक्त ५३ होते. आता पर्यंत एकुण राष्ट्रीय पक्ष १४ आहेत. ही सर्व माहिती का ? तर आपल्याला सर्वांना माहीत असायला हवं की यातील किती राष्ट्रीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यात १८ वर्षाच्या आतील मुलांच्या सर्वंकष प्रश्नाबद्दल बोलतात.?

भारतातील पहिल्या लोकसभा निवडणुकीत ४७.३२% लोकांनी मताधिकार बजावला. त्या नंतर झालेल्या १९५७ च्या निवडणुकीत ६८.१८ % लोकांना मताधिकार बजावला. त्यानंतर सर्वात जास्त मतदान१९६७ साली ६९.६४ झाले होते. मागील लोकसभा निवडणुकीत फक्त ४९.८७ % मताधिकार बजावला गेला. अजूनही ५०% पेक्षा अधिक लोकांना आपल्या मुलांसाठी मताधिकार बजायला आपण पुढाकार घ्यायला हवे.

भारतीय लोकसंख्येच्या १५% लोक आजही रात्री उपाशीपोटी झोपतात. १९४ मिलीयन भारतीय कुपोषित जीवन जगतायेत. ग्लोबल इंडेक्स हंगर मध्ये ११७ देशांमध्ये भारताचा नंबर १०४ आहे.२०% मुले कुपोषित आहे. तर ३८% मुल त्यांच्या आवश्यक असणाऱ्या वजनापेक्षा कमी वजनाचे आहेत. ४०% अन्न आपण वाया घालवतो. तर काहींना अन्न मिळवणं मुश्किल झालं आहे. हे चित्र बदलायचे असेल तर आपल्याला भूमिका घ्यायला हवी .बालहक्काचा बाबत राजकर्त्यांना भूमिका घ्यायला भाग पाडू या. तसेच शंभर टक्के मतदान होईल याकडे लोकांनी लक्ष द्यायला हवे.

यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिषदेचे पदाधिकारी ज्योती पाटील, अर्चना पाटील, यामिनी खैरनार, शितल पाटील, आशा पाटील ,शितल पाटील, सपना नेरकर यांनी श्रम घेतले. भारती पवार, राधीका गिरासे, वैशाली रामोळे, कविता फुलपगारे, मोहिनी मोरे, भावना पाटील, कविता पाटील, कविता गुरव, मनिषा भोई, मनिषा गुरव इ. सह परिस्थितीत महिला उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम