२ हजारांची नोट बदलविण्याची तारीख संपली ; आता नवा पर्याय !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ ऑक्टोबर २०२३

देशभरात गेल्या काही दिवसाआधीच २ हजारांची नोट बदलविण्याची घोषणा झाल्यानंतर अनेक लोक मोठ्या गोंधळात पडले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा करण्याची मुदत दिली होती, जी नंतर ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. आता ती बदलण्याची आणि जमा करण्याची अंतिम मुदत संपली आहे, पण त्यानंतरही तुम्ही २००० रुपयांची नोट बदलू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, ७ ऑक्टोबरनंतर कोणतीही बँक २००० रुपयांचे चलन स्वीकारणार नाही. मात्र, त्यानंतरही या नोटा कायदेशीर राहतील. पण, तरीही तुमच्याकडेही दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर मुदत संपल्यानंतरही तुम्ही त्या बदलून जमा करू शकता.

आरबीआयने ३० सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली होती, त्यानुसार बँका ८ ऑक्टोबरपासून २,००० रुपयांची नोट स्वीकारणार नाहीत आणि ती त्यांच्या खात्यात जमाही करणार नाहीत. तसेच, ती इतर कोणत्याही नोटासोबत बदलली जाणार नाही. मात्र, या नोटा तुम्हाला एका प्रकारे नोट जमा आणि बदलून घेता येणार आहे.
यासाठी तुम्हाला RBI च्या १९ क्षेत्रीय कार्यालयांपैकी एकाला भेट द्यावी लागेल. तुम्ही कोणत्याही शाखेत जाऊन नोट बदलून मिळवू शकता किंवा तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. याशिवाय, तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे RBI कार्यालयात २००० रुपयांची नोट देखील पाठवू शकता.

तुम्ही अजुनही २,००० रुपये बदलले नसल्यास, आता तुम्ही RBI च्या १९ कार्यालयांपैकी कोणत्याही एका कार्यालयात जाऊ शकता किंवा पोस्ट ऑफिसद्वारे पाठवू शकता. २,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी RBI कोणतेही शुल्क आकारणार नाही.

RBI च्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरम यांचा समावेश आहे. आरबीआयनुसार, कोणतीही संस्था किंवा व्यक्ती २०,००० रुपयांपर्यंतच्या खात्यात २,००० रुपयांची नोट जमा किंवा बदलू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम