आजपासून बदलू शकणार २ हजाराची नोट !
दै. बातमीदार । २३ मे २०२३ । देशात गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 ची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. त्या 2000 च्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला आजपासून म्हणजेच मंगळवारपासून 23 मे सुरू होत आहे. ग्राहक 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये 2000 च्या नोटा बदलून किंवा त्यांच्या खात्यात जमा करू शकतात.
आरबीआयच्या मुदतीनंतरही 2000 ची नोट कायदेशीर राहील. म्हणजेच सध्याच्या नोटा अवैध ठरणार नाहीत. लोकांना या नोटा लवकरच बँकांमध्ये परत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही अंतिम मुदत आहे.
आरबीआय आणि एसबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नोटा बदलण्यासाठी कोणत्याही आयडीची आवश्यकता नाही आणि कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. एका वेळी 20,000 रुपयांच्या फक्त 10 नोटा बदलल्या जातील, परंतु या नोटा खात्यात जमा करण्यावर कोणतीही मर्यादा नाही. बँका 2000 च्या नोटा जारी करणार नाहीत. नोव्हेंबर 2016 मध्ये 2 हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या होत्या. त्याऐवजी नव्या पॅटर्नमध्ये 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. RBI ने 2018-19 पासून 2000 च्या नोटांची छपाई बंद केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम