नव्या संसदेचे उद्घाटनासाठी चेन्नईतून 21 संत रवाना !
दै. बातमीदार । २६ मे २०२३ । देशात नव्या संसदेचे उद्या रविवारी उद्घाटन होईल. नवीन वास्तू देशातील वैविध्यपूर्ण संस्कृतीशी निगडीत आहे. ती बनवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणलेल्या वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. तिचे फ्लोअरिंग त्रिपुराच्या बांबूने करण्यात आले आहे. तर सागवान लाकूड नागपुरातून आणले आहे. याशिवाय लोकसभा – राज्यसभेची विशाल भिंत व संसदेबाहेर बसवण्यात आलेले अशोकचक्र इंदूरहून आणण्यात आले आहे.
चेन्नईच्या धर्मपुरम अधिनाम येथील 21 संत उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी व पंतप्रधान मोदींना सुवर्ण राजदंड (सेंगोल) देण्यासाठी चेन्नईहून दिल्लीला रवाना झालेत. या संतानी पीएम मोदींना देण्यासाठी एक खास भेटवस्तूही आणली आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या संसदेभोवती चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 70 पोलिस तैनात करण्यात आलेत. एसीपी दर्जाचे अधिकारी सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून आहेत.
नव्या संसदेत देशातील सर्वच राज्यांची झलक दिसून येईल. तिचे फ्लोअरिंग त्रिपुराच्या बांबूने करण्यात आले आहे. तर कार्पेट उत्तर प्रदेशातील मिर्झापूरचे आहे. येथे वापरले जाणारे सागवान लाकूड नागपुरातून आणले आहे. लाल-पांढरे वाळूचे खडे राजस्थानच्या सर्मथुरा येथून आणण्यात आलेत. लाल किल्ला व हुमायूंच्या थडग्यातही हे खडे वापरण्यात आलेत. भगवा हिरवा दगड उदयपूर येथून, लाल ग्रॅनाइट अजमेरजवळील लाखा येथून आणि पांढरा संगमरवरी राजस्थानातील अंबाजी येथून आणला गेला आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या चेंबर्समधील फॉल्स सिलिंगसाठी स्टील स्ट्रक्चर दमण-दीव येथून खरेदी करण्यात आले आहे. फर्निचर मुंबईत बनवण्यात आले आहे. राजस्थानातील राजनगर आणि नोएडा येथून दगडी जाळीचे काम करण्यात आले. गेला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम