
देशातील २३५ जिल्ह्यांना बसला पुराचा फटका !
दै. बातमीदार । २१ जुलै २०२३ । देशात पावसाचा मोठा कहर सुरु असून त्यात राज्यातील कोकणातील काही गावामध्ये मोठे नुकसान देखील झाले आहे. त्याठिकाणी बचावकार्य अजून देखील सुरु असल्याची माहिती मिळत असतांना देशभरातील 22 राज्यांमधील 235 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या पावसाळ्यात 19 जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे 747 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुरामुळे 2.50 लाख हेक्टर पीक नष्ट झाले आहे. त्याचबरोबर मृत जनावरांची संख्या 21 हजारांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रातील रायगड येथे भूस्खलनामुळे 48 घरे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. रायगडमध्ये 6 पैकी 3 नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत.
यामध्ये अंबा, सावित्री आणि पाताळगंगा यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुंडलिका, गढ़ी आणि उल्हास नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे. महाराष्ट्रात पूरसदृश परिस्थिती असताना एनडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, गुजरातमधील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर 6 जिल्ह्यांमध्ये NDRF तैनात करण्यात आले आहे.जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश. या राज्यांमध्ये हलका पाऊस पडेल: पंजाब, हरियाणा, दिल्ली, झारखंड, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय येथे विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम