राज्यात शिक्षकांची ३० टक्के पद भरली जाणार ; मंत्री केसरकर !
दै. बातमीदार । २४ डिसेंबर २०२२ । नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जयंत आसगावकर, सुधीर तांबे यांनी शिक्षक भरतीप्रश्नी आज तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर केसरकर म्हणाले, २०१९-२०च्या संच मान्यतेनुसार प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ३७ हजार ८४ पदे रिक्त आहेत.
कोरोनाच्या साथीमुळे शिक्षक भरती बंद होती, त्यावरील बंदी उठवली असून फेब्रुवारी महिन्यात टेट (शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणी) परीक्षा आयोजित करण्यात येणार असून मार्चमध्ये त्याचा निकाल लावण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी (२३ डिसेंबर) विधान परिषदेत दिली.
अल्पसंख्यांक शाळेतील ३५९५, पेसा विभागतील ४८४९ आणि कोकणातील २८५२ पदे शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आता ३० टक्के रिक्त पदे भरण्याचे सरकारचे नियोजन आहे. टप्प्याटप्प्याने रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्यात येईल. फेब्रुवारीत होणारी टेट परिक्षा आयबीपीएस कंपनीमार्फत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेचा लगेच मार्च माहिन्यात निकाल लागेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.या चर्चेत इतर सदस्यांनी सहभाग नोंदवला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम