विद्यापीठात मरणोत्तर नेत्रदान जनजागृती कार्यशाळा

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त शिबिर

बातमी शेअर करा...

विद्यापीठात मरणोत्तर नेत्रदान जनजागृती कार्यशाळा

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त शिबिर

जळगावः उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यापीठात मरणोत्तर नेत्रदान जनजागृती कार्यशाळा आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी परिपत्रक काढून दि. २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर नेत्रदान जागृती आणि रक्तदान शिबिर घेण्याचे निर्देश दिले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी मरणोत्तर नेत्रदान कार्यशाळा घेण्यात आली. कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सहसंचालक डॉ. कपिल सिंघेल यांची प्रमुख उपस्थिती होते. मु.जे. महाविद्यालयातील प्रा. मनोज चोपडा यांचे नेत्रदानाविषयी व्याख्यान झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान कोणत्या व्यक्ती करू शकतात याची माहिती पीपीटी द्वारे दिली. या कार्यक्रमात ८० रा.से.यो. स्वयंसेवक सहभागी झाले होते. रा.से.यो.

संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठ रा.से.यो. एकक कार्यक्रम अधिकारी डॉ. के.पी. दांडगे यांनी आभार मानले. मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहा रक्तदान शिबिर झाले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्य.प. सदस्य अॅड अमोल पाटील, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. पवित्रा पाटील, डॉ. एस.टी. भुकन, डॉ. अनिल डोंगरे, प्रा. म.सु. पगारे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा. सुरेखा पालवे, नितीन झाल्टे, सहसंचालक डॉ. कपिल सिंघल, अधिसभा सदस्य सुरेखा पाटील, भानुदास येवलेकर, ऋषिकेश चित्तम, डॉ. सचिन नांद्रे उपस्थित होते. यावेळी २१ जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये डॉ. शिवाजी पाटील, डॉ. कपिल सिघेल, इंजि. आर. आय. पाटील, सीए रवींद्र पाटील, डॉ. सचिन नांद्र, शरद पाटील, शिवाजी पाटील यांचा समावेश होता, माधवराव गोळवलकर रक्तसंकलन केंद्राने सहकार्य केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम