भूस्खलनासह ढगफुटी ३१ जणांचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ ऑगस्ट २०२३ | गेल्या दोन दिवसांपासून हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडत असून २४ तासांत भूस्खलन, ढगफुटी आणि पावसाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 16 ऑगस्टपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.

मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. डोंगरावरून अजूनही दगड पडत आहेत. ढिगाऱ्यासह मंदिराच्या वरती चार ते पाच झाडे उन्मळून पडली. यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. एसडीआरएफ, आयटीबीपी, पोलीस आणि स्थानिक लोक बचावकार्यात गुंतले आहेत. जेसीबी मशिनने ढिगारा काढला जात आहे. सीएम सुखविंदर सिंह सुखूही घटनास्थळी पोहोचले. स्थानिक प्रशासन ढिगारा हटवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार नरेश चौहान म्हणाले की, 10 ते 15 लोक अडकल्याची भीती आहे.

स्थानिक रहिवासी किशोर ठाकूर यांनी सांगितले की त्यांचे 4 पुतणे देखील मंदिरात अडकले आहेत. ते म्हणाले की, काही लोक म्हणत आहेत की मंदिरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी फोन आले आहेत. ही अफवा आहे की तथ्य हे माहीत नाही. ते म्हणाले की, दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी मंदिरात भंडारा होतो आणि आज श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे. त्यामुळे त्यांच्या पुतण्यासह सहा-सात जण मंदिरात खीर बनवण्यासाठी हजर होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम