
शेताच्या बांधावर मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
शेताच्या बांधावर मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
साकळी शिवारात घडली घटना
यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील साकळी शिवारामध्ये एका मजुराने शेताच्या बांधावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी, २७ एप्रिल रोजी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव मानसिंग जवानसिंग भिलाला (वय ५०, रा. शिरसाठ, ता. यावल) असे आहे. ते आपल्या कुटुंबासह गावात राहत होते. रविवारी सकाळी साकळी गावाच्या शिवारात ईश्वर लोधी यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या निंबाच्या झाडाला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने त्यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, सहाय्यक फौजदार अर्जुन सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम